Header Ads

रणसिंग महाविद्यालयात'विश्वास' राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

 रणसिंग महाविद्यालयात'विश्वास' राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न .

--------------------------------

प्रतिनिधी इंदापूर गणेश धनवडे.

--------------------------------

इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या   ४७ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता.इंदापूर येथे संस्थेचे  'विश्वास'आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन संस्था विश्वस्त  शंकरराव रणसिंग यांच्या हस्ते करण्यात आले.संयोजन समितीचे समन्वयक  प्रा.डॉ.विजय केसकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.संस्थेचे विश्वस्त शंकरराव रणसिंग यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव  विरसिंह रणसिंग,तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय प्राचार्य डॉ. अविनाश जगताप, उपप्राचार्य प्रा.डॉ.सचिन गाडेकर, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रा. डॉ. नानासाहेब गोफणे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांक विजेता संस्कार मंदिर महाविद्यालय वारजे माळवाडी पुणे चा विद्यार्थी रोहन ज्योतीराम कवडे यांना रोख रु. १०.०००,प्रशस्तीपत्र सन्मान चिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.द्वितीय क्रमांक विजेता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे चा विद्यार्थी तेजस दिनकर पाटील यांना रक्कम रु. ७०००,प्रशस्तिपत्र,सन्मान चिन्ह देवून

सन्मानित करण्यात आले.तृतीय क्रमांक

शिवाजी विधी महाविद्यालय,परभणी हनुमान सुभाषराव आहेर यांना रक्कम रु. ५०००,प्रशस्तिपत्र सन्मानचिन्ह देवून  सन्मानित करण्यात आले. माजी विद्यार्थी प्रा. डॉ.नानासाहेब गोफणे यांच्यातर्फे उत्तेजनार्थ बक्षीस

विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब

मयुरी मोहन रासकर यांना रक्कम  ३००० रु ,प्रशस्तिपत्र सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक काळंगे,उपप्राचार्य प्रा.ज्ञानेश्वर गुळीग,उपप्राचार्य  प्रा.डॉ प्रशांत शिंदे,परीक्षक,डॉ.महादेव वाळुंज (कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,भिगवण),परीक्षक डॉ.राहुल जगदाळे (कै.तुकाराम धोंडिबा पठारे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चंदननगर,पुणे) परीक्षक प्रा.डॉ.सीमा गोसावी (तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती),माध्यमिक विद्यालय तावशीचे  मुख्याध्यापक महादेव बागल,माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी मुख्याध्यापक प्रमोद भोंग,संयोजन समितीचे सदस्य, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, महाविद्यालयातील विद्यार्थी व स्पर्धक उपस्थित होते.या स्पर्धेसाठी पुणे,मुंबई,छत्रपती संभाजीनगर, नागपूर, परभणी, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, सांगली इत्यादी जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयांमधून  २५ स्पर्धक सहभागी झाले होते.निवेदन प्रा.डॉ.तेजश्री हुंबे, प्रा.अभिजीत शिंगाडे, प्रा. विद्या गुळीग यांनी केले. तर उपप्राचार्य प्रा.डॉ.प्रशांत शिंदे, प्रा.ज्ञानेश्वर गुळीग यांनी आभार मानले.

No comments:

Powered by Blogger.