कास गावातील अंतर्गत वीज लाईन दुरुस्ती पूर्ण; छत्रपती संघटनेतर्फे कार्यकारी अभियंत्यांचे आभार.
कास गावातील अंतर्गत वीज लाईन दुरुस्ती पूर्ण; छत्रपती संघटनेतर्फे कार्यकारी अभियंत्यांचे आभार.
-------------------------------
प्रतिनिधी/ शेखर जाधव
-------------------------------
सातारा / जावली : कास गावातील अंतर्गत वीज लाईन दुरुस्तीचे काम तत्परतेने पूर्ण केल्याबद्दल कार्यकारी अभियंता (विद्युत) कार्यालय, सातारा तसेच वायरमेन नारायण साहेब यांचे छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
कास गावात काही दिवसांपासून अंतर्गत वीज लाईनमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे नागरिकांना वीजपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर छत्रपती संघटनेने पाठपुरावा केल्यानंतर संबंधित विभागाने तातडीने दखल घेत दुरुस्तीचे काम हाती घेतले. अल्पावधीतच हे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.
या दुरुस्तीमुळे गावातील वीजपुरवठा सुरळीत आणि सुरक्षित झाला असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. नागरिकांची मोठी समस्या दूर झाल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संपादक तृषांत सुरेश (भाई) शेलार, उपसंपादक तानाजी महादेव किर्दत, महाराष्ट्र अध्यक्ष अनिल सूर्यकांत मोरे, दत्ता सिताराम किर्दत तसेच सर्व पदाधिकारी व सदस्यांनी कार्यकारी अभियंता (विद्युत) कार्यालय, सातारा आणि वायरमेन नारायण साहेब यांचे विशेष आभार मानले आहेत.
“भविष्यातही असेच सहकार्य लाभावे,” अशी अपेक्षा व्यक्त करत छत्रपती संघटनेने जय शिवराय, जय महाराष्ट्र असा जयघोष केला.

No comments: