कुपवाड येथील ३३ वर्षीय तरुण बेपत्ता; शोध घेण्याचे पोलिसांचे आवाहन.
कुपवाड येथील ३३ वर्षीय तरुण बेपत्ता; शोध घेण्याचे पोलिसांचे आवाहन.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मिरज तालुका:-प्रतिनिधी राजू कदम
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कुपवाड | प्रतिनिधी, ता.२७ : एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे हद्दीतील दत्तनगर, कुपवाड येथील एक ३३ वर्षीय तरुण गेल्या १६ दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची खबर त्याचे भाऊ मल्लाप्पा शरणाप्पा आलमेल (वय ५०) यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडू शरणाप्पा आलमेल (वय ३३) हा तरुण ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास 'कुपवाड उरूस येथे जाऊन येतो' असे सांगून घरातून बाहेर पडला होता. मात्र, तो अद्याप घरी परतलेला नाही. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता तो मिळून आला नसल्याने अखेर एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात मिसींग रजिस्टर नं. ०४/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे.बेपत्ता व्यक्तीचे वर्णन नाव: बंडू शरणाप्पा आलमेल, वय ३३ वर्षे , रंग- सावळा, उंची- ५ फूट ३ इंच, मध्यमबांधा, चेहरा: नाक सरळ, केस बारीक, अंगात काळ्या रंगाचा शर्ट (त्यावर पांढऱ्या रंगाचे ठिपके), काळ्या रंगाची पॅन्ट आणि पायात काळ्या रंगाची चप्पल असे आहे.तरी वरील वर्णनाचा इसम कोणास मिळून आल्यास किंवा त्याबाबत काही माहिती असल्यास तात्काळ एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे (दुरध्वनी: ०२३३-२६४४३३३) किंवा तपासी अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल भांबुरे (ब.नं. २५७) 8857061123 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

No comments: