Header Ads

शरदनगर कुपवाड येथे जुन्या वादातून मारहाण; अ‍ॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल.

 शरदनगर कुपवाड येथे जुन्या वादातून मारहाण; अ‍ॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल.

कुपवाड : शरदनगर परिसरात जुन्या वादाच्या रागातून तरुणास मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे येथे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्रमोद लक्ष्मण कांबळे (वय ३४, व्यवसाय मजुरी, रा. मशिद जवळ, शरदनगर कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी समीर शहाजान मुल्ला (वय अंदाजे ३०) व शहाजान मुल्ला (वय अंदाजे ५५, दोघे रा. शरदनगर कुपवाड) यांच्याविरुद्ध गु. र. नं. ५३/२०२६ अन्वये बीएनएस कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ३५१(३) तसेच अ‍ॅट्रोसिटी कायदा कलम ३(१)(r), ३(२)(va) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता शरदनगर येथील ‘लकी चिकन सेंटर’ समोर ही घटना घडली. फिर्यादी हे तेथून जात असताना वर्षभरापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी समीर मुल्ला याने त्यांना हाक मारून शिवीगाळ केली व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी शहाजान मुल्ला यांनी लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या हात व पायावर मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर आरोपीने दुकानातून धारदार लोखंडी वस्तू आणून फिर्यादीच्या डोक्यात वार केल्याने ते जखमी होऊन खाली पडले. घटनेदरम्यान फिर्यादीची आई मंगल कांबळे मध्यस्थी करण्यासाठी आली असता तिलाही शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ११.४७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक संदीप भागवत (सांगली विभाग) करीत आहेत.

No comments:

Powered by Blogger.