मिरजजवळ टाटा सुमोच्या धडकेत शेतकरी जखमी; चालकाविरोधात गुन्हा दाखल.
मिरजजवळ टाटा सुमोच्या धडकेत शेतकरी जखमी; चालकाविरोधात गुन्हा दाखल.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मिरज तालुका:- प्रतिनिधी राजु कदम
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मिरज : एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे हद्दीत टाटा सुमोच्या धडकेत एक शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 51/2026 अन्वये बीएनएस कलम 281, 125(अ), 125(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फिर्यादी तानाजी सहदेव कांबळे (वय 65, व्यवसाय शेती, रा. तानग हायस्कूलच्या पाठीमागे, ता. मिरज, जि. सांगली) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 4.30 वाजता तानग ते तासगाव फाटा मार्गे मिरजकडे जाणाऱ्या रस्त्यावर अपघात झाला.
टाटा सुमो (क्रमांक MH 50 A 7508) वरील चालक अवधूत पार्थनाळे (सध्या रा. सावळी) याने वाहन भरधाव व बेदरकारपणे चालवून फिर्यादी यांच्या हिरो होंडा स्प्लेंडर (MH 10 DC 5134) मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात फिर्यादी यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला असून कमरेस व पाठीमागील उजव्या बाजूस दुखापत झाली आहे.
हा गुन्हा दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 12.49 वाजता दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार पाटील (क्र. 39) करत आहेत.

No comments: