Header Ads

कत्तलीसाठी नेत असलेल्या जनावरांसह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त.

 कत्तलीसाठी नेत असलेल्या जनावरांसह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त. 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

गांधीनगर पोलिसांची कारवाई 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

गांधीनगर:- कत्तल करण्याच्या हेतून ७ बैल आणि २ गाई अशी नऊ जनावरांची बेकायदेशीरपणे आणि अमानुषपणे वाहतूक करणारा टेम्पो गांधीनगर पोलीसांनी जप्त केला. बैले, गायी आणि टेम्पो असा एकूण ५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी संदीप दिलीप साठे (वय ३८)रा . साठे नगर उरण ईश्वरपूर ता वाळवा जिल्हा सांगली,) सचिन निवास साळुंखे (रा. पेट नाका, जिल्हा सांगली,) असिफ बेपारी रा . कराड, जिल्हा सातारा,) या तिघांवर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई उचगाव हायवे ब्रिजवर करण्यात आली. याबाबतची फिर्याद मानद प्राणी कल्याण अधिकारी आशिष कमलाकांत बारीक (वय२७,रा. घाटकोपर पश्चिम मुंबई) 


याबाबतची माहिती अशी की, कत्तलीच्या हेतून ७ खिलार बैले, आणि दोन गायी यांची वाहतूक होत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते आशिष बारीक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाली . त्यांनी पोलीसांच्या मदतीने पुणे बंगळूर महामार्गावर तावडे हॉटेलजवळ टेम्पो क्र. एस एच १० डब्ल्यू ८१०७ या टेम्पोची तपासणी केली. यावेळी टेम्पोमध्ये जनावरांची कोणतीही काळजी न घेता त्यांना बेकायदेशीरपणे आणि अमानुषपणे त्यांची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. टेम्पोचालक यांच्याकडे चौकशी केली असता ही जनावरे कत्तल करण्यासाठी कर्नाटककडे नेत असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत आशिष बारीक यांनी पोलीसांत फिर्याद दिल्यानंतर पोलीसांनी सुमारे सहा लाख रुपयांचा हा सर्व मुद्देमात जप्त केला . या कारवाईमध्ये गांधीनगर भारतीय सिंधू सभेचे मनोज बचवानी, रवी मलानी, अमन कामरा, व हिंदुत्ववादी कार्यकर्ते यांनी या कारवाईत सहभाग घेतला. आणि त्या जनावरांना इस्लामपूर कराड येथील प्राणी संग्रहालयात पाठवण्यात आले. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.


फोटो ओळ:- कत्तलीसाठी खिलारी बैले आणि गायी घेऊन जाणारा टेम्पो सामाजिक कार्यकर्ते आणि गांधीनगर पोलिसांनी पकडला .

No comments:

Powered by Blogger.