Header Ads

पुणे येथे 4, 18 एप्रिल आणि 2 मे रोजी महसूल अदालत

 पुणे येथे 4, 18 एप्रिल आणि 2 मे रोजी महसूल अदालत

-------------------------------

 मिरज तालुका प्रतिनिधी 

राजू कदम

-------------------------------

 सांगली, दि. 31 (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार संपूर्ण राज्यात “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांतील अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे विभाग पुणे यांच्याकडे दाखल असणाऱ्या अर्धन्यायिक प्रकरणांच्या अनुषंगाने अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांच्या कार्यालयात दि. 4 एप्रिल 2026, दि. 18 एप्रिल 2026 व दि. 2 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याचे पुणे विभाग अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता व्दिवेदी यांनी प्रसिध्दीपकाव्दारे कळविले आहे.


 या लोकअदालतीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पक्षकारांनी विहीत अर्जाचा नमुना भरून सादर करणे आवश्यक आहे. विहीत नमुन्यातील अर्ज लोकअदालतीच्या दिनांकापूर्वी एक आठवड्यापर्यंत सादर करता येईल. अर्ज सादर करण्यासाठी जिल्हानिहाय मोबाईल क्रमांकही देण्यात आले आहेत. त्यानुसार सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यासाठी 9767395608, पुण्यासाठी 9604328718, तर सांगली व सातारा जिल्ह्यासाठी 9527161763 या क्रमांकांवर व्हॉट्सअॅपद्वारे अर्ज पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे.


 मुदतीमध्ये प्राप्त होणाऱ्या अर्जांच्या अनुषंगाने ठरविण्यात आलेल्या दिवशी व ठिकाणी लोक अदालतीमधील कामकाजामध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार संबंधित प्रकरणातील आवश्यक पक्षकारांना लोकअदालतीच्या वेळी व ठिकाणी उपस्थित ठेवण्याची जबाबदारी अर्ज सादर करणाऱ्या पक्षकारांची राहील, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

No comments:

Powered by Blogger.