Header Ads

देशात पहिले ‘मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर’ जयसिंगपूर आरोग्य केंद्राने उभारले.

 देशात पहिले ‘मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर’ जयसिंगपूर आरोग्य केंद्राने उभारले.

------------------------------------

जयसिंगपूर  प्रतिनिधी 

------------------------------------

सरकारी दवाखाने नेहमीच सर्वसामान्य रुग्णांना दिलासा देणारी ठरत असतात. मात्र, जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राने आरोग्य सेवा देण्याच्या पलिकडे जाऊन सर्व अत्याधुनिक सुविधा देणारे केंद्र बनले आहे. सध्या या आरोग्य केंद्राने ‘देशात प्रथमच’ ‘मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर’ उभारण्याचा मान पटकाविला आहे. या आरोग्य केंद्राने राज्यस्तरीय मानांकन प्राप्त केली आहेच तर राष्ट्रीय मानांकनसाठीही याची निवड करण्यात आली आहे. राज्यात नव्हे तर देशातील या आरोग्य केंद्राचा नावलौकिक वाढला आहे.


कोल्हापूर जिल्हा परिषदेचे जयसिंगपूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. इतर आरोग्य केंद्रे 30 ते 35 हजार लोकसंख्येसाठी असतात. मात्र या आरोग्य केंद्रावर 1 लाख 20 हजार लोकसंख्येचा भार आहे. याअंतर्गत उदगांव, चिंचवाड, संभाजीपूर, चिपरी, कोंडिग्रे या गावांचा समावेश आहे. गेल्या 7 ते 8 वर्षात जयसिंगपूर आरोग्य केंद्राचा कायापालट वैद्यकीय अधिकारी डॉ.पांडूरंग खटावकर यांच्या माध्यमातून झाला आहे. स्वच्छ सर्वांग सुंदर दवाखाना या उपक्रमात सलग ५ वर्षे जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. त्याचबरोबर कायाकल्प योजनेतही सलग ३ वर्षे जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तसेच एनक्युएएस हे राज्यस्तरीय मानांकन जयसिंगपूर या एकमेव आरोग्य केंद्राने मिळविले आहे. त्यामुळे आता याची राष्ट्रीय मानांकनासाठी निवड झाली आहे.


डॉ.पांडुरंग खटावकर यांच्या मागणीनंतर रोटरीचे बी.टी.नाईक, इंजि.विनेश खाडे, आशुतोष पाटील, रोहित कुसनाळे यांच्या प्रयत्नातून आंतरराष्ट्रीय दर्जाची इन्फोसिस कंपनीच्या सीएसआर फंडातून जयसिंगपूर आरोग्य केंद्रात मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर सुमारे 1 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आले आहे.


या उभारण्यात आलेल्या मॉड्यूलर ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन टेबल (रिमोटवरील), प्रसुती टेबल, भूलचे मशीन, बेबी वॉर्मर, शॅडोलेस लॅम्प, स्क्रबर मशीन, अत्याधुनिक लाईट, एसी, बाळाचे ठोके मोजण्याचे मशीन (फिटल मॉनिटर), रुग्णांचे अत्याधुनिक मॉनिटर मशीन, सक्षन मशीन अशा अत्याधुनिक पद्धतीचे थिएटर उभारण्यात आले आहे. त्यामुळे जयसिंगपूर आरोग्य केंद्र हे राज्यात नव्हे तर देशात एकमेव आरोग्य केंद्र ठरले आहे.


कोट-लोकसहभागातून अधिकारी, पदाधिकारी व सर्व कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा सातत्याने उंचावत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत. याठिकाणी महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सध्या अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर व प्रसुतीगृहामुळे निर्जंतुक वातावरण ठेवून यशस्वी शस्त्रक्रिया व प्रसुती होतील, याचा रुग्णांनी लाभ घ्यावा.


-डॉ.पांडुरंग खटावकर, तालुका आरोग्य अधिकारी, शिरोळ


फोटो


जयसिंगपूर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात देशात प्रथमच ‘मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर’ उभारण्यात आले.


फोटो-


जयसिंगपूर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उभारण्यात आलेले ‘मॉड्यूलर प्रसुती गृह’.


फोटो-

-डॉ.पांडुरंग खटावकर

No comments:

Powered by Blogger.