एमआयडीसी कुपवाड हद्दीत कारखान्यातील चोरी उघड – ४८ तासांत आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त.
एमआयडीसी कुपवाड हद्दीत कारखान्यातील चोरी उघड – ४८ तासांत आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त.
सांगली : एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे यांच्या पथकाने एमआयडीसी कुपवाड परिसरातील कारखान्यात झालेल्या चोरीचा गुन्हा अवघ्या ४८ तासांत उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली असून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. २८ मार्च २०२६ रोजी पहाटे सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास मिरज एमआयडीसी परिसरातील एका कंपनीच्या आवारातून मालवाहतूक टेम्पो चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी फिर्यादी संजय बिरिल रेजूर (वय ४२, रा. सिद्धार्थनगर, कुपवाड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल लोकेशनच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान आरोपी हे कंपनीत कामाच्या बहाण्याने काही दिवसांपूर्वी दाखल झाले होते, असे निष्पन्न झाले.
पोलिसांच्या पथकाने महाराष्ट्र-गुजरात सीमेजवळ सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून सुमारे ६ लाख रुपये किमतीचा चोरीस गेलेला मालवाहतूक टेम्पो जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
अमित कुमार झरीलाल महतो (वय २३, रा. बिहार)
चेतन सुरेश शर्मा (रा. बिहार)
या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
ही कारवाई संदीप पुगे, कल्पना बारवकर व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीसांकडून सुरू आहे.

No comments: