पेट्रोल साठा आहे, मग पेट्रोल बंद का,- हातकणंगले तालुक्यात नागरिकांचा संताप पारदर्शकतेची मागणी जोरात .
पेट्रोल साठा आहे, मग पेट्रोल बंद का,- हातकणंगले तालुक्यात नागरिकांचा संताप पारदर्शकतेची मागणी जोरात .
*****************
अंबप : किशोर जासूद
******************
पेट्रोल मिळणार नाही या अफवांमुळे पेट्रोल पंपांवर अचानक गर्दी वाढली. अनेकांनी भीतीपोटी आवश्यकतेपेक्षा जास्त इंधन भरून घेतल्याने काही पंपांवरील साठा लवकर संपला, हे वास्तव असले तरी सर्वच पंपांबाबत हेच कारण लागू होते का, काही पंपावर पावर पेट्रोल विकले जात आहे कांहीं ठिकाणी पंप बंद ठेवले जात असताना, प्रत्यक्षात साठा उपलब्ध असूनही विक्री का होत नाही.
पंप बंद असल्यामुळे त्यांना अनेक किलोमीटर अंतर कापून इतर ठिकाणी जावे लागत आहे. शेतीची कामे, दैनंदिन प्रवास आणि आपत्कालीन गरजा यावर त्याचा थेट परिणाम होत आहे. त्यामुळे ही केवळ गैरसोय नसून ग्रामीण जीवनावर परिणाम करणारी गंभीर बाब बनली आहे. दरम्यान, काही पंपधारकांकडून वितरणातील अडचणी, टँकर उशिरा येणे किंवा आर्थिक व्यवहारांतील बदल यासारखी कारणे दिली जात आहेत. मात्र ही कारणे कितपत खरी आणि सर्व पंपांवर समान आहेत का, याबाबत अधिकृत पातळीवर स्पष्टता नाही. यामुळेच नागरिकांमध्ये संशय अधिक बळावला आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून प्रशासनाकडे ठोस मागणी केली जात आहे की, प्रत्यक्षात ज्या पंपांकडे साठा उपलब्ध असूनही विक्री केली जात नाही, अशा पंपांची चौकशी व्हावी. तसेच ज्या ठिकाणी खरोखरच साठा संपलेला आहे, त्या ठिकाणीही पारदर्शकपणे माहिती फलक लावून जनतेला स्पष्ट कळवावे.
पेट्रोल पंपांवर “साठा उपलब्ध नाही” किंवा “टँकर येण्याची प्रतीक्षा” याबाबत स्पष्ट सूचना दिल्यास नागरिकांमध्ये होणारा गोंधळ आणि अफवांना आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सध्याच्या परिस्थितीत प्रशासनाने केवळ साठा पुरेसा असल्याचे सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष पातळीवर देखरेख वाढवणे, पंपांची अचानक तपासणी करणे आणि माहिती पारदर्शक ठेवणे गरजेचे झाले आहे. अन्यथा “साठा असूनही पंप बंद” ही भावना अधिक तीव्र होऊन लोकांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता आहे.
पंप बंद असल्यामुळे त्यांना अनेक किलोमीटर अंतर कापून इतर ठिकाणी जावे लागत आहे. शेतीची कामे, दैनंदिन प्रवास आणि आपत्कालीन गरजा यावर त्याचा थेट परिणाम होत आहे. त्यामुळे ही केवळ गैरसोय नसून ग्रामीण जीवनावर परिणाम करणारी गंभीर बाब बनली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यावर बारकाईने लक्ष देऊन कोणत्या पंपावर किती पेट्रोल शिल्लक आहे यावर नजर ठेवणे गरजेचे आहे यातून काळाबाजार तर होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
........
पेट्रोल पंप बंद अंबप अंबपवाडी मंगराचीवाडी

No comments: