सोन्याची शिरोली येथे रामनवमी उत्सवात.
सोन्याची शिरोली येथे रामनवमी उत्सवात.
***********************
राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली येथे रामनवमी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला असल्याची माहिती उत्सव कमिटीचे अध्यक्ष विजय गुरव यांनी दिली
सोन्याची शिरोली येथे राम गल्ली असून या राम गल्लीमध्ये रामनवमी निमित्त राम मूर्ती ला सकाळी अभिषेक करण्यात आला त्यानंतर दुपारी बारा वाजता राम जन्मकाळ महिला च्या वतीने पाळणा तसे गाणी म्हणून साजरा करण्यात आला सायंकाळी सात वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक पुरुष महिला मुले अशा भक्तांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतल असल्याचे रामनवमी उत्सव कमिटीचे अध्यक्ष विजय गुरव यांनी सांगितले तसेच रात्री दहा वाजता गजर सोंगाचा जागर लोककलेचा अतिशय आकर्षक व पारंपारिक कार्यक्रम सादर करण्यात आला असून भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला असल्याचे विजय गुरव यांनी सांगितले व या कार्यक्रमासाठी उत्सव कमिटीचे कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले असल्याचे शेवटी उत्सव कमिटीचे अध्यक्ष विजय गुरव यांनी सांगितले

No comments: