मिरज खून प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद.
मिरज खून प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद.
*********************
📍 सांगली प्रतिनिधी
राजु कदम
*********************
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगलीच्या पथकाने मिरज येथील खून व मोक्का गुन्ह्यातील सात महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस अटक केली. अमन समीर मुल्ला (वय 20, रा. सांगली/मिरज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सदर गुन्हा सप्टेंबर 2025 मध्ये दाखल असून, निखील विलास कलगुटगी यांच्या खुनाचा यात समावेश आहे. या प्रकरणात एकूण 15 आरोपी व दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मिरज शहरातील सांगलीकर मळा परिसरात सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे व त्यांच्या पथकाने केली.
सदर आरोपीस पुढील कारवाईसाठी मिरज शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.

No comments: