Header Ads

प्रा. डॉ.एन. डी. पाटील महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न .

 प्रा. डॉ.एन. डी. पाटील महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न .

 रयत शिक्षण संस्था संचलित प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालय मलकापूर -पेरीड येथे मंगळवार दिनांक २४ मार्च २०२६ रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. सदर कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. संभाजी पाटील, प्रख्यात साहित्यिक व माजी सदस्य, मॅनेजिंग कौन्सिल रयत शिक्षण संस्था हे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शिक्षणाचा उपयोग करावा तसेच शिक्षणाच्या माध्यमातून चारित्र्याची व व्यक्तिमत्वाची जडणघडण करावी असे मत प्रकट केले. पुढे त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमता ओळखाव्यात तसेच पारंपारिक क्षेत्राबरोबर इतर नवनवीन क्षेत्रांमध्ये करिअर शोधावे असा सल्ला दिला. पालकांनी विद्यार्थ्यांना वेगळे मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य देणे गरजेचे आहे. विद्यार्थी दशेमध्येच ध्येय निश्चित करणे व ध्येयप्रती समर्पित होऊन कार्य करणे गरजेचे असल्याचे सांगितले. समर्पण हे यशाचे गमक असून आत्मविश्वासाच्या बळावर क्रीडा, सांस्कृतिक व कलेच्या क्षेत्रामध्ये भरीव कार्य करून देशाच्या विकासामध्ये विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.

 महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पवार पी.जी. यांनी उपस्थितांचे स्वागत केले व महाविद्यालयाचा शैक्षणिक, संस्कृतिक, क्रीडा व संशोधन कार्य यांचा अहवाल सादर केला. याप्रसंगी वेगवेगळ्या क्रीडा, सांस्कृतिक व इतर स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. महाविद्यालयातील सेवकांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. प्रो.डॉ. जयवंत इंगळे, प्रो.डॉ. बनसोडे एस.पी., शारीरिक शिक्षण संचालक वाघ एस.ई. प्रा. गांधी एस. डी. , श्री तडावळेकर एस.एस.,श्री. सुधाकर जायगडे व श्रीमती कांबळे संगीता यांचा गौरव करण्यात आला. शारीरिक शिक्षण संचालक वाघ एस.ई. यांनी क्रीडा विभागाचा अहवाल सादर केला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. सुहास पाटील,भारत पाटील उपप्राचार्य डॉ. पोरे एस. बी.,डॉ. बनसोडे एस.पी. महाविद्यालयातील सर्व सेवक व विद्यार्थी उपस्थित होते. 

 या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष डॉक्टर गिरी सी. एस. यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. प्रा. श्रीमती सूर्यवंशी आर. टी. व प्रा. खबाले आर.बी. यांनी सूत्रसंचालन केले.

No comments:

Powered by Blogger.