Header Ads

८ तासांत चेन स्नॅचर जेरबंद; १० लाखांचा मुद्देमाल जप्त.

 ८ तासांत चेन स्नॅचर जेरबंद; १० लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपीचे नाव 

सुदीप संजय मेंगळे वय 19 वर्ष रा. कोयना सोसायटी सदर बाजार सातारा.

--------------------------------------

सातारा प्रतिनिधी अमर इंदलकर.

---------------------------------------

सातारा शहरात भरदिवसा वृद्ध महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी अवघ्या ८ तासांत अटक केली आहे. या कारवाईत ४ गुन्हे उघडकीस आणत तब्बल १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. १८ मार्च रोजी दुपारी पोवई नाका ते भाजी मंडई मार्गावर एका मोटारसायकलस्वाराने चालत जाणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने ओढून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

या कारवाईस तुषार दोशी, डॉ. वैशाली कडूकर आणि राजीव नवले यांचे मार्गदर्शन लाभले. तर तपासाची धुरा अविनाश माने यांनी सांभाळली.

कारवाईचा तपशील :

सातारा शहर डी.बी. पथकाने घटनास्थळ परिसरात चौकशी करत संशयितांची माहिती मिळवली. आरोपी गुन्हा केल्यानंतर वेगवेगळे कपडे बदलून व विविध वाहनांचा वापर करून पोलिसांना चकवा देत होता. तो मिलार, कुडाळ आणि मेरुलिंग परिसरातील डोंगर भागात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला.

रात्रीच्या सुमारास आरोपी मोटारसायकलवरून पळून जात असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

गुन्ह्यांची कबुली :

कसून चौकशीत आरोपीने सातारा शहर, सातारा तालुका आणि भुईंज पोलीस ठाणे हद्दीत ३ ठिकाणी वृद्ध महिलांचे मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली. तसेच पुण्यातून मोटारसायकल चोरी केल्याचेही उघड झाले.

जप्त मुद्देमाल :

पोलिसांनी आरोपीकडून

सोन्याचे दागिने

यामाहा RX100 मोटारसायकल

यामाहा R15

व्हेस्पा स्कूटर

असा एकूण सुमारे १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सातारा पोलिसांच्या या जलद आणि धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

No comments:

Powered by Blogger.