अंबप येथे मोफत BP व शुगर तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद..
अंबप येथे मोफत BP व शुगर तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद..
-------------------------------------
अंबप प्रतिनिधी
किशोर जासूद
-------------------------------------
अंबप येथील चिरायु क्लिनिकचे डॉ. अजिंक्य वडगावकर यांच्या पुढाकारातून मोफत रक्तदाब (BP) व रक्तातील साखर (शुगर) तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे दीडशे नागरिकांनी तपासणी करून घेतली.
शिबिरामध्ये उपस्थित नागरिकांची रक्तदाब व साखरेची तपासणी करून त्यांना आवश्यक त्या आरोग्यविषयक सूचना देण्यात आल्या. बदलत्या जीवनशैलीमुळे वाढत असलेल्या रक्तदाब व मधुमेहाच्या समस्यांबाबत जनजागृती करण्यासाठी असे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असल्याचे डॉ. वडगावकर यांनी यावेळी सांगितले.
ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे ग्रामस्थांनी कौतुक केले. भविष्यातही अशा प्रकारचे आरोग्य शिबिर नियमितपणे आयोजित करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.

No comments: