Header Ads

आदर्श कामगार पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन.

 आदर्श कामगार पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

--------------------------------

 सातारा जावली प्रतिनिधी 

शेखर जाधव

--------------------------------

गुणवंत कामगार प्रतिष्ठान जिल्हा सातारचे वतीने ०१ मे २०२६ या कामगार दिनाचे निमित्याने सातारा जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योग, साखर कारखाने, सहकारी बँकिंग व जे उद्योग व्यवसाय महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळाचे सभासद आहेत अशा व्यवस्थापनातील कामगार कर्मचारी यांना आदर्श कामगार पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असून या करिता अर्ज सादर करण्याचे आवाहन गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा यांनी केले आहे 

. संबंधितांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज आपल्या व्यवस्थापनाच्या शिफारशी सह, अध्यक्ष श्री. जयंत देशपांडे १५६ सोमवार पेठ सातारा किंवा श्री. इकबाल बबन काझी, सहयोग कॉलनी, पोदार शाळे जवळ, तामजाईनगर, सातारा, श्री. गोपाळ खजुरे,अहिरे कॉलनी,देगाव रोड, सातारा यांच्या पत्त्यावर *दिनांक २० एप्रिल* पूर्वी पोहोचतील अशा बेताने नियत वेळेत पाठवावेत.

उशिरा आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही या पुरस्कारासाठी व्यवस्थापन स्थरातील व्यक्तीशिवाय अन्य कामगार कर्मचारी यांना सहभागी होता येईल.

. इच्छुकांनी आपले अर्ज नियोजित वेळेत वरील पत्त्यावर पाठवावेत असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे अधिक माहितीसाठी व नमुना अर्जासाठी श्री. इकबाल काझी, सातारा 98 50 5070 86 श्री. जयंत देशपांडे, सातारा 98 60 10 23 82 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयंत देशपांडे ,सरचिटणीस दादासाहेब काळे, उपाध्यक्ष अमृत साळुंखे, प्रसिद्धी प्रमुख अभिजित शिंगटे यांनी केले आहे.

No comments:

Powered by Blogger.