Header Ads

वाळवा खून प्रकरण उघड; तीन आरोपी तात्काळ जेरबंद.

 वाळवा खून प्रकरण उघड; तीन आरोपी तात्काळ जेरबंद

------------------------------------

सांगली प्रतिनिधी

राजू कदम 

------------------------------------

सांगली, दि. ३० मार्च – वाळवा तालुक्यातील खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जलद तपास करून अवघ्या काही तासांत उलगडा करत तीन आरोपींना अटक केली आहे. आष्टा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २९ मार्च रोजी पहाटे १.०० ते सकाळी ६.३० दरम्यान वाळवा येथील अहिरवाडी रोडवरील रॉयल हॉटेलजवळ देसाई प्लॉट परिसरात ही घटना घडली. संदेश उर्फ साहिल अशोक कदम (वय ३०, रा. माळभाग, ता. वाळवा) यांचा निर्घृण खून करण्यात आला होता.

या प्रकरणी प्रथमेश उर्फ बबलू आमसिद्ध कोळी (वय २१), अभिजीत उर्फ सोन्या बजरंग परीट (वय २४) आणि राजश्री आमसिद्ध कोळी (वय ४६, तिघेही रा. वाळवा, ता. वाळवा, जि. सांगली) यांना अटक करण्यात आली आहे.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, मयत संदेश कदम हा आरोपींच्या कुटुंबातील महिलेचा छळ करत असल्याच्या कारणावरून वारंवार वाद होत होते. त्याचाच राग मनात धरून आरोपींनी संगनमताने संदेश कदम याला दारू पाजून काठी व दगडाने मारहाण करून त्याचा खून केला आणि मृतदेह घराबाहेर टाकला.

पोलीस अधीक्षक संदीप घुगे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्या पथकाने तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढत त्यांना ताब्यात घेतले.

आरोपींना पुढील तपासासाठी आष्टा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.

No comments:

Powered by Blogger.