विद्यामंदिर पेंडाखळे येथे ' सहावी शिक्षण परिषद ' मोठ्या उत्साहात संपन्न.
विद्यामंदिर पेंडाखळे येथे ' सहावी शिक्षण परिषद ' मोठ्या उत्साहात संपन्न.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
शाहुवाडी प्रतिनिधी
आनंदा तेलवणकर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
शाहुवाडी : शाहुवाडी तालुक्यातील विद्यामंदिर पेंडाखळे शाळेत नुकतीच ' सहावी शिक्षण परिषद' अतिशय मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या परिषदेत शिक्षकांसाठी नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम आणि अध्यापन पद्धतींवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. केंद्रप्रमुख श्रीकांत गुर्जर यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रमुख्याध्यापक संजय तळप आणि मुख्याध्यापक गजानन सुतार यांनी पूजन केले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्रीमती प्रमिला कोकणी यांनी केले.मार्गदर्शक मीरा बोऱ्हाडे आणि शिल्पा शिंगाडे यांनी उपस्थितांना नवीन शैक्षणिक संकल्पना व अध्यापन पद्धतींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. परिषदेच्या निमित्ताने शिक्षकांमध्ये शैक्षणिक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली, ज्यामुळे नवीन ऊर्जा मिळाल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावजी पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकवृंद यांनी अथक परिश्रम घेतले. यात सुभाष गांगुर्डे, शिवाजी कोरवी, जयसिंग कांबळे आणि रेवती मांडरेकर यांचे योगदान विशेष उल्लेखनीय ठरले.कार्यक्रमाचा समारोप शुभांगी रावते यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.

No comments: