बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह सापडला विहिरीत.अल्पवयीन मुलांनी खून केल्याची दिली धक्कादायक कबुली.
बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह सापडला विहिरीत.अल्पवयीन मुलांनी खून केल्याची दिली धक्कादायक कबुली.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सांगली प्रतिनिधी
राजू कदम.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहित मुकेश म्हैशाळ (रा. सांगली) यांची हरवल्याची तक्रार विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. दरम्यान, आठ दिवसांनंतर विठ्ठलनगर येथील मार्टिन स्कूलजवळील विहिरीत एका बॅरलमध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी चौकशीदरम्यान दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषदेसमोरील त्रिकोणी बाग परिसरातून रोहित म्हैशाळ याला जबरदस्तीने पकडून गाडीत बसवून विठ्ठलनगर येथील मार्टिन स्कूलजवळील पडीत घराजवळ नेण्यात आले. तेथे त्याला तीन दिवस मारहाण केल्याचेही समोर आले आहे.
यानंतर रोहितचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह बॅरलमध्ये टाकून त्यावर दगड ठेवून जवळील विहिरीत फेकून दिल्याची कबुली अल्पवयीन मुलाने पोलिसांना दिली. या कबुलीनंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता विहिरीतून बॅरलमध्ये मृतदेह आढळून आला.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.

No comments: