स्त्रियांनी कार्यातून अस्तित्व निर्माण केले : कोठावळे रश्मी
स्त्रियांनी कार्यातून अस्तित्व निर्माण केले : कोठावळे रश्मी
--------------
रोहित फास्टे.
---------------
--------
रयत शिक्षण संस्था संचलित प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालय येथे महिला सक्षमीकरण कक्ष मार्फत 'जागतिक महिला दिन' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी मा. कोठावळे रश्मी, नगराध्यक्षा, मलकापूर नगर परिषद, मलकापूर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये
प्रत्येक दिवस हा महिला दिवसच असतो. महिलांनी आरोग्य, सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये आपले कर्तुत्व सिद्ध केले असल्याचे सांगितले. या प्रसंगी मा. गिरीजा कोकरे-देसाई, महिला, बालकल्याण व शिक्षण सभापती, नगरपरिषद मलकापूर या उपस्थित होत्या. आपल्या मनोगतामध्ये त्यांनी महिलांनी आपल्या क्षमता ओळखणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. सामाजिक बांधिलकी जपत असताना महिलांनी आपले आरोग्याकडे व कुटुंबाकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पवार पी.जी. यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये स्त्रियांचे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय योगदान याविषयी सविस्तर माहिती दिली
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला सबलीकरण कक्ष प्रमुख डॉ. श्रीमती लवेकर एस. एस. यांनी केले. प्रा.गांधी एस.डी. यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्रीमती सूर्यवंशी आर. टी. यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.कुमारी बेंडके मृण्मयी यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बनसोडे एस. पी., डॉ. पोरे एस. बी. इतर प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments: