Header Ads

वनश्री रोपवाटिकेच्या वतीने कष्टकरी ज्येष्ठांचा सत्कार.

 वनश्री रोपवाटिकेच्या वतीने कष्टकरी ज्येष्ठांचा सत्कार

-----------------------------

मुरगूड प्रतिनिधी 

जोतीराम कुंभार

-----------------------------

गाडगेबाबा जयंतीनिमित्त एक पात्री प्रयोग आणि झुणका भाकर वाटप. 

  मुरगूड येथील वनश्री मोफत रोपवाटिकेच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे निष्काम कर्मयोगी संतश्रेष्ठ गाडगेबाबा यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. प्रारंभी संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन नगरसेवक सुहास खराडे,नगरसेवक सत्यजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबांच्या जीवनपट उलगडणारा प्रबोधन पर एक पात्री प्रयोग प्रा. डॉ. नवनाथ शिंदे यांच्या सादरीकरणाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते.

वनश्री मोफत रोपवाटिकेच्या माध्यमातून वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी हे प्रतीवर्षी या कार्यक्रमाचे आयोजित करीत असलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ मा ग गुरव हे होते. तर एम टी सामंत, दत्तामामा खराडे, सर्वश्री नगरसेवक एस व्ही चौगले, सुनील रणवरे, सुनील मंडलिक, राहुल शिंदे, प्राचार्य महादेव कानकेकर, बाळासाहेब सुर्यवंशी, संभाजीराव आंगज यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपक्रमाचे हे २४ वे वर्ष आहे.

      या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कष्टकरी ज्येष्ठांचा व आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांचा सत्कार होय. यावेळी इंदुबाई नरके, लक्ष्मीबाई मारुती वरपे, मंजुळा बाबुराव परीट, (वाघापूर) शेवंता परीट, लहू घोटणे, अलका साताप्पा कांबळे, सुमन विजय कांबळे, हौसा गुंडा कांबळे, सुनिता कुमार कांबळे, प्रमिला केशव कांबळे, मनीषा सुरेश कांबळे, या आरोग्य विभागातील कर्मचारी व बहुजन उपेक्षित कष्टकरी यांचा मानाचा फेटा,शाल व सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला.

   या कार्यक्रमास वृद्धाश्रम चालिका विमलताई सुतार, मुख्याध्यापिका योगिनी शेटे, सुमन अनावकर, जोतीराम कुंभार, भैरवनाथ डवरी,प्रा.रविंद्र शिंदे,समीर कटके,संदीप मुसळे,, सर्जेराव भाट,ओंकार पोतदार, तुकाराम परीट, विश्वनाथ शिंदे, सुभाष पाटील,तानाजी डवरी, विशाल पाटील,प्रदिप वर्णे,नारायण सुतार आदिंसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वागत प्रास्ताविक वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांनी तर आभार मोहन जिरगे यांनी मानले.



चौकट- 


मुरगूडमध्ये अवतरले संतश्रेष्ठ गाडगेबाबा....


 निष्काम कर्मयोगी गाडगेबाबांच्या जयंती कार्यक्रम स्थळी सर्व लोक सभा मंडपात स्थानापन झाले होते. मान्यवर व्यासपीठावर विराजमान झाले होते. एवढ्यात डोक्यावर फुटकं खापर,वाढलेली पांढरी दाढी, हातामध्ये खराटा,काठी आणि अंगावर पांगरलेली फाटकी वस्त्र अशा वेषामध्ये गाडगे बाबा कार्यक्रम स्थळी प्रवेशित झाले आणि सभामंडपातील साऱ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या आणि सभागृह स्तब्ध झाले. कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि प्रा. डॉ. नवनाथ शिंदे यांनी गाडगेबाबांच्या वेषामध्ये बाबांच्या "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे भजन गायनाला सुरुवात केली. 

याठिकाणी साऱ्यांच्या समोर आज प्रत्यक्ष गाडगेबाबा अवतरले होते. आणि अचंबित होऊन सारे मनाचे काम करून गाडगेबाबांचे कीर्तन ऐकत होते.

No comments:

Powered by Blogger.