Header Ads

प्रफुल्लित केंद्रामार्फत विविध स्पर्धांचा भव्य बक्षीस समारंभ उत्साहात संपन्न.

 प्रफुल्लित केंद्रामार्फत विविध स्पर्धांचा भव्य बक्षीस समारंभ उत्साहात संपन्न.

'पितृ वंदन' उपक्रमाने उपस्थितांचे पाणावले डोळे!











--------------------------------

संस्कार कुंभार

---------------------------------

कोल्हापूर : प्रफुल्लित केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा अत्यंत उत्साहात आणि विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांनी पार पडला. या स्पर्धांमध्ये पीएम श्री विद्यालय,फुलेवाडी, सिद्धेश्वर प्रासादिक विद्यालय,सानेगुरुजी, कै. मीनाताई ठाकरे विद्यालय,रिंग रोड या शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी प्रत्येक शाळेत स्वतंत्रपणे हा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या थाटात आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करण्यासोबतच राबवण्यात आलेल्या 'पितृ वंदन' या संस्कारक्षम उपक्रमाने उपस्थित सर्वांचीच मने जिंकली.

सिद्धेश्वर प्रासादिक विद्यालयामध्ये बक्षीस वितरणासोबतच एका अत्यंत भावनिक आणि अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. "ज्या आई-वडिलांच्या सुसंस्कारांतून रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज घडले, तोच मातृ-पितृ भक्तीचा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा," या उदात्त प्रेरणेतून प्रफुल्लित केंद्रातर्फे शाळेत 'पितृ वंदन' पालकांचे पाद्यपूजन हा उपक्रम राबवण्यात आला.सिद्धेश्वर प्रासादिक विद्यालय आणि प्रफुल्लित केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या सोहळ्यात, मुलांनी जेव्हा नतमस्तक होऊन आपल्या आई-वडिलांच्या चरणांचे पूजन केले, तेव्हा तो प्रसंग पाहून उपस्थित विद्यार्थी आणि पालकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. आनंदाश्रूंनी भारावलेल्या या भावपूर्ण वातावरणाचे सर्व पालक आणि शिक्षकांनी भरभरून कौतुक केले.या संपूर्ण दिमाखदार आणि तितक्याच भावनिक कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्ट व नियोजनबद्ध सूत्रसंचालन प्रफुल्लित केंद्राच्या संचालिका रेश्मा काटकर यांनी केले. त्यांच्या बहारदार शब्दफेकीने कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली. शिवरायांच्या विचारांचा जागर आणि आई-वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

या विविध शाळांमध्ये पार पडलेल्या सोहळ्यांना  पी.एम. श्री विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनुराधा शिंत्रे,कै. मीनाताई ठाकरे विद्यालयाचे मुख्याध्यापक सातपुते सर, सिद्धेश्वर शाळेचे संस्थापक दिलीप जोशी, मुख्याध्यापक तानाजी यादव उपस्थित होते.सेच, या संपूर्ण उपक्रमाचे यशस्वी आयोजन करणारे 'प्रफुल्लित केंद्राचे' संस्थापक व विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. प्रफुल्ल पाटील, अध्यक्षा डॉ. अल्फिया बागवान, बिस्मिल्ला नदाफ, वर्धा वीर, प्रिन्स पाटील यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी तिन्ही शाळांतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक बहुसंख्येने उपस्थित होते.या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

No comments:

Powered by Blogger.