Header Ads

एन.डी. पाटील महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा.

 एन.डी. पाटील महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा.









--------------------------------------------

रोहित फास्टे

-------------------------------------------

मराठी भाषा टिकली तर संस्कृती टिकेल असे मत प्रा.डॉ. एन. डी.पाटील महाविद्यालयाच्या मराठी भाषा दिन या कार्यक्रमात बोलताना बाळकृष्ण जाधव यांनी मांडले. ते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.  ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, "आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मराठी टिकवण्यासाठी युवकांनी मराठी साहित्याचे वाचन वाढवले पाहिजे. प्रभावी मराठी बोलणे हा आपला अभिमान असायला हवा. कुसुमाग्रजांनी आपल्या काव्यातून क्रांतीसंप्रदायाची निर्मिती केली. गर्जा जयजयकार सारखी कविता देशाच्या पारतंत्र्याला स्वातंत्र्यात बदलविण्यास महत्त्वपूर्ण ठरली. संस्कृती टिकविण्याची असेल तर आपली भाषा आपण टिकवायला हवी. छोट्या छोट्या समूहातून भाषेची जोपासना आजही होत आहे. अमृताची पैजा जिंकण्याची तिची क्षमता आजही टिकून आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ.एम.डी कदम म्हणाले की, इंग्रजीचा मराठी भाषेत शिरकाव होत असताना त्याला  मराठीतील प्रतिशब्द वापरायला हवेत. असे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ.सुतार बी. ए. यांनी केले. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ठाणेकर बी. एम. यांनी केले.  कार्यक्रमाचे आभार डॉ. पाडळकर व्ही. व्ही. यांनी मांडले. सदर कार्यक्रमाच्या वेळी सृजनाची काव्य फुले या मराठी भाषेतील विद्यार्थ्यांच्या हस्तलिखितांचा कवितासंग्रह प्रकाशित करण्यात आला. या कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी व महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.