राधानगरी पंचायत समितीवर 'काँग्रेस'चे वर्चस्व; सभापतीपदी राजेंद्र पाटील, तर उपसभापतीपदी अश्विनी चौगुले यांची , चार विरुद्ध सहा मताने निवड.
राधानगरी पंचायत समितीवर 'काँग्रेस'चे वर्चस्व; सभापतीपदी राजेंद्र पाटील, तर उपसभापतीपदी अश्विनी चौगुले यांची , चार विरुद्ध सहा मताने निवड.
----------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
----------------------------------
राधानगरी पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी झालेली निवड प्रक्रिया अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडली. यामध्ये सभापतीपदी राजेंद्र यशवंत पाटील आणि उपसभापतीपदी सौ. अश्विनी चंद्रकांत चौगुले या दोघांची चार विरुद्ध सहा मताने निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी दुपारी दोन वाजता या निवडीची अधिकृत घोषणा केली.
राधानगरी पंचायत समितीच्या शाहू सभागृहात तहसीलदार अनिता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. या सभेत काँग्रेसचे सभापती पदाचे उमेदवार राजेंद्र यशवंत पाटील व उपसभापती पदासाठी सौ अश्विनी चंद्रकांत चौगुले या दोघांची विरोधात सभापती पदासाठी संग्राम कलिकते व उपसभापती केरबा पाटील यांनी अर्ज दाखल केले होते त्यानंतर मतदान घेण्यात आले राजेंद्र पाटील यांना सहा मते तर संग्राम कलीकते यांना चार तर उपसभापती पदासाठी सौ अश्विनी चौगुले यांना सहा मते तर केरबा पाटील यांना 4 मते मिळाले असून त्यामध्ये सभापतीपदी राजेंद्र यशवंत पाटील तर उपसभापती सौ अश्विनी चंद्रकांत चौगुले हे दोघेजण चार विरुद्ध सहा मताने निवडून आली असल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी जाहीर केली
या सभापती व उपसभापती निवडीसाठी काँग्रेसचे मोहन पाटील, अमृता पाटील, वंदना जाधव, सूर्यकांत पाटील तसेच अजित पवार गटाच्या पुनम पाटील, संग्राम कलीकते आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे केरबा पाटील, मंगल कांबळे हे सर्व सदस्य उपस्थित होते. या निवडीमुळे राधानगरी पंचायत समितीवर आय काँग्रेसची सत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.
सोळांकुर गावाला मिळाला चौथ्यांदा बहुमान:
या निवडीमुळे सोळांकुर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. १९६९ मध्ये महालिंगा शेटी, १९८८ मध्ये ज्ञानदेव पाटील आणि २०२१ मध्ये सौ. सोनाली पाटील यांच्यानंतर आता १० जुलै २०२६ रोजी राजेंद्र यशवंत पाटील यांच्या रूपाने गावाला चौथ्यांदा सभापती पद मिळाले आहे.
कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि मिरवणूक:
निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत परिसर दणाणून सोडला. राधानगरी शहरातून वाजत-गाजत नूतन पदाधिकाऱ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक सोळांकुर आणि कुडीत्री गावांत पोहोचल्यावर ग्रामस्थांनी त्यांचे जंगी स्वागत केले. याप्रसंगी तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments: