कोल्हापूरला 120 पेक्षा जादा नवीन ‘लालपरी’ बसेस – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
कोल्हापूरला 120 पेक्षा जादा नवीन ‘लालपरी’ बसेस – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक.
--------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी विजय बकरे :
संभाजीनगर येथील नव्या एसटी बसस्थानकाच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी 120 पेक्षा जादा नवीन एसटी बसेस देण्याची घोषणा केली. या कार्यक्रमास पालकमंत्री प्रकाश आबिटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
उद्घाटनावेळी महिला कर्मचाऱ्यांकडून मंत्र्यांचे औक्षण करण्यात आले. सुमारे 9.80 कोटी रुपयांच्या निधीतून उभारलेल्या या अद्यावत बसस्थानकामुळे प्रवाशांना सुविधा वाढणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी सरनाईक यांनी 1 जूनपासून बसस्थानकांवरील स्वच्छतागृह प्रवाशांसाठी मोफत ठेवण्याचे तसेच नियमित स्वच्छतेचे आदेश दिले. रंकाळा बसस्थानकाच्या नूतनीकरणाबाबतही सकारात्मक भूमिका व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमास आमदार चंद्रदीप नरके, संबंधित अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: