इचलकरंजी फोटोग्राफर असोसिएशनची प्रीमियर लीग – सिझन २ उत्साहात सुरू
इचलकरंजी फोटोग्राफर असोसिएशनची प्रीमियर लीग – सिझन २ उत्साहात सुरू.
-----------------------------इचलकरंजी प्रतिनिधी.
लखन जाधव.
----------------------------
इचलकरंजी (प्रतिनिधी) :
इचलकरंजी फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रीमियर लीग – सिझन २ या क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. हॅपी १७, राऊंड टर्फ (जुना चंदूर रोड), इचलकरंजी येथे झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेच्या माध्यमातून फोटोग्राफर बांधवांमध्ये एकात्मता वाढविण्यासोबतच क्रीडावृत्तीला चालना मिळत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. स्पर्धेमुळे सर्व सहभागी खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, संघभावना आणि मैत्री दृढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
उद्घाटनप्रसंगी आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी आयोजकांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असल्याचे सांगितले. तसेच युवकांनी क्रीडा क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी इचलकरंजी फोटोग्राफर असोसिएशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संघांचे खेळाडू तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेचे नियोजन सुयोग्य पद्धतीने करण्यात आले असून, आगामी काही दिवसांमध्ये रंगतदार सामने पाहायला मिळणार आहेत.


No comments: