Header Ads

साताऱ्यात मोठी पोलिसी कारवाई! रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत मालुसरे २ वर्षांसाठी तडीपार. पाचगणी पोलिसांची ठोस कारवाई; नागरिकांत समाधान – दहशतीतून सुटका.

 साताऱ्यात मोठी पोलिसी कारवाई! रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत मालुसरे २ वर्षांसाठी तडीपार.

पाचगणी पोलिसांची ठोस कारवाई; नागरिकांत समाधान – दहशतीतून सुटका.

--------------------------

सातारा जिल्हा प्रतिनिधी 

अमर इंदलकर.

------------------------

सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पाचगणी पोलिसांनी मोठी कारवाई करत रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याला तब्बल दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे. या कारवाईमुळे परिसरात दिलासा व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोडवली (पो. खिंगर, ता. महाबळेश्वर) येथील रहिवासी असलेल्या भरत मालुसरे याच्याविरुद्ध पाचगणी पोलीस ठाण्यात यापूर्वी शरीराविरुद्ध तसेच मालमत्तेविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. त्याच्या वर्तनामुळे स्थानिक नागरिक दहशतीत जीवन जगत असल्याच्या तक्रारी होत्या.

यामुळे पाचगणी पोलिसांनी संबंधित इसमाविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे सादर केला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई विभाग यांनी साक्षीदारांची पडताळणी करून हा प्रस्ताव पुढे पाठवला.


दंडाधिकाऱ्यांचा आदेश.


उपविभागीय दंडाधिकारी, वाई विभाग यांनी आदेश क्रमांक एमएजी/हद्दपार/एसआर ०६/२०२५ (दि. १० एप्रिल २०२६) अन्वये भरत तुकाराम मालुसरे याला २ वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश पारित केला आहे.

-------------------------------

नागरिकांचा दिलासा – आणखी कारवाईचा इशारा.

-------------------------------

या कारवाईनंतर स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, दहशतीच्या वातावरणातून मुक्तता झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. पोलिसांनीही स्पष्ट केले आहे की, सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या इतर इसमांवरही अशाच प्रकारची हद्दपार कारवाई प्रस्तावित आहे.

---------------------

पोलिसांचे आवाहन.

----------------------


नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता गुन्ह्यांविरोधात तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.


कारवाईत सहभागी अधिकारी.

--------------------------------

ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार, उपनिरीक्षक बालाजी सोनुने, पो. हवालदार श्रीकांत कांबळे यांनी पार पाडली.


FN महाराष्ट्रचा सवाल:

--------------------------

गुन्हेगारांवर पोलिसांचा वाढता दबाव – आता साताऱ्यात गुन्हेगारीला आळा बसणार का?

No comments:

Powered by Blogger.