रंकाळा बस स्थानकावर चोरट्याचा पर्दाफाश; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे आरोपी ताब्यात.
रंकाळा बस स्थानकावर चोरट्याचा पर्दाफाश; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे आरोपी ताब्यात.
------------------
विजय बकरे .
------------------
कोल्हापूर शहरातील रंकाळा बस स्थानक येथे गर्दीचा फायदा घेत पाकीटमारी करणाऱ्या चोरट्याला प्रवाशांच्या सतर्कतेमुळे रंगेहात पकडण्यात आले. संबंधित आरोपीला तत्काळ एसटी अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करून नंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास स्थानकावर मोठी वर्दळ असताना विजय संतोष कांबळे (रा. शिरोली) हा प्रवाशांच्या पैशांवर डल्ला मारण्याच्या प्रयत्नात होता. यावेळी एका प्रवाशाचे पाकीट चोरण्याचा प्रयत्न करताना त्याला उपस्थितांनी रंगेहात पकडले.
यानंतर आरोपीला स्थानकावरील वाहतूक नियंत्रक बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती देत आरोपीला त्यांच्या ताब्यात दिले.
दरम्यान, रंकाळा बस स्थानक हे शहरातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे कायमच प्रवाशांची मोठी गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेत अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी प्रवासी व नागरिकांकडून जोर धरत आहे.

No comments: