Header Ads

जोतिबाच्या चैत्र यात्रेत १० हजार भाविकांना महाप्रसाद.

जोतिबाच्या चैत्र यात्रेत १० हजार भाविकांना महाप्रसाद.

-----------------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी : विजय बकरे

----------------------------------------

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध जोतिबा चैत्र यात्रा उत्साहात पार पडली असून या यात्रेनिमित्त पंचगंगा नदी परिसरात वालवलकर ट्रस्टच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा सुमारे १० हजार भाविकांनी लाभ घेतल्याची माहिती ट्रस्टचे सुनील निकम यांनी दिली.

महाराष्ट्रासह कर्नाटकातून मोठ्या संख्येने भाविक दरवर्षी जोतिबा यात्रेसाठी येतात. गेल्या वीस वर्षांपासून वालवलकर ट्रस्टच्या माध्यमातून पंचगंगा नदी परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाही महिला, पुरुष तसेच लहान मुलांसह हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

या उपक्रमासाठी ट्रस्टचे सुमारे २० कार्यकर्ते व कर्मचारी सहभागी झाले होते. संपूर्ण नियोजन गुरुदत्त देसाई यांनी केले. भाविकांची सोय, स्वच्छता आणि नियोजन याकडे विशेष लक्ष देण्यात आले होते.

यापुढेही हा महाप्रसाद उपक्रम कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा मानस असल्याचे सुनील निकम यांनी सांगितले.

No comments:

Powered by Blogger.