Header Ads

इचलकरंजीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी


 इचलकरंजीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.

-------------------------

इचलकरंजी प्रतिनिधी.

लखन जाधव.

-------------------------

इचलकरंजी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (परंपरेनुसार) येथील शिवतीर्थ येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

यावेळी आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच त्यांनी महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले.

याचप्रसंगी रवी रजपुते फाउंडेशनच्या वतीने नागरिकांसाठी सरबत वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा उपक्रम आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते पार पडला. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमामुळे उपस्थित नागरिकांना दिलासा मिळाला.

या कार्यक्रमास सभापती, नगरसेवक तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.