Header Ads

इचलकरंजीत बाळनाथ महाराज जयंतीनिमित्त पालखी सोहळा उत्साहात

 इचलकरंजीत बाळनाथ महाराज जयंतीनिमित्त पालखी सोहळा उत्साहात.

---------------------------

इचलकरंजी प्रतिनिधी.

लखन जाधव.

------------------------

श्री सद्गुरू बाळनाथ महाराज राऊळ शिवयोगी मठ, इचलकरंजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या निमित्ताने सकाळपासून अभिषेक, पूजन, नामस्मरण, भजन-कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पालखी मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या गजरात व जयघोषात मार्गक्रमण करत परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

या सोहळ्यास आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी उपस्थित राहून बाळनाथ महाराजांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी भाविकांना जयंतीनिमित्त शुभेच्छा देत अशा आध्यात्मिक कार्यक्रमांमुळे समाजात श्रद्धा, एकात्मता आणि सकारात्मकता वाढीस लागते, असे मत व्यक्त केले.

सोहळ्यास महापौर, नगरसेवक, विविध पदाधिकारी तसेच नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.