कोल्हापुरात सामाजिक बांधिलकीचा आदर्श; मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापुरात सामाजिक बांधिलकीचा आदर्श; मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.
----------------------------कोल्हापूर प्रतिनिधी.
----------------------
समाजाप्रती असलेली जबाबदारी जपत कोल्हापुरात रेगेडियन फिटनेस क्लब, रंकाळा आणि कोरगावकर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरामध्ये जनरल फिजिशियन, फिजिओथेरपिस्ट, होमिओपॅथी तसेच ऑर्थोपेडिक तज्ज्ञांनी नागरिकांची सखोल तपासणी केली. यासोबतच बीपी, शुगर तपासणी तसेच हृदयविकारासंदर्भातील (कार्डिओलॉजी) मार्गदर्शन देण्यात आले. एकाच छताखाली विविध आरोग्यसेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
शिबिराचे उद्घाटन नगरसेवक प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी कोरगावकर ग्रुपचे प्रमुख आकाश कोरगावकर, राज कोरगावकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमात 100 हून अधिक नागरिकांनी सहभाग घेत आरोग्य तपासणी करून घेतली तसेच रक्तदान करून सामाजिक कार्यात मोलाचे योगदान दिले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

No comments: