Header Ads

भेंडवडे येथे व्यायाम शाळा बांधकाम प्रकल्पाचा शुभारंभ उत्साहात

 भेंडवडे येथे व्यायाम शाळा बांधकाम प्रकल्पाचा शुभारंभ 

-----------------

महेश कांबळे.

----------------

हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे येथील बौद्ध नगर परिसरात व्यायाम शाळा बांधकाम प्रकल्पाचा शुभारंभ उत्साहात संपन्न झाला. जिल्हा क्रीडा अधिकारी, कोल्हापूर यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या व्यायाम शाळा विकास अनुदान योजना (विशेष घटक) अंतर्गत हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

या महत्त्वपूर्ण योजनेचा शुभारंभ कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समिती सभापती शितलताई प्रवीण यादव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी युवा नेते अभिजीत माने (भैय्या), शशिकांत माने, माजी सरपंच काकासाहेब चव्हाण, माजी उपसरपंच सुहास देसाई, संजय देसाई, हणमंत पवार, महावीर कांबळे, रोहन कांबळे, राजू कोळी, संग्राम माने, नयुम पठाण, शशिकांत कांबळे, विजय माने, अतुल पाटील, दिलीप कांबळे, संजय कांबळे, अर्चना कसबेकर, संगीता कांबळे, बेबीताई कांबळे यांच्यासह विद्यमान ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्य, स्थानिक नागरिक, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या व्यायाम शाळेमुळे परिसरातील युवकांना आधुनिक सुविधा उपलब्ध होऊन त्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाला चालना मिळणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

No comments:

Powered by Blogger.