Header Ads

शेतकऱ्यांचे आजचे चांदोली जंगलक्षेत्रातील जण आंदोलन म्हणजे जंगल सत्याग्रहाची सुरुवात - तानाजी सावंत. वनविभागाला दिलेल्या मागण्या मान्य करण्यासाठी दिला २१ दिवसांचा अल्टिमेटम.

 शेतकऱ्यांचे आजचे चांदोली जंगलक्षेत्रातील जण आंदोलन म्हणजे जंगल सत्याग्रहाची सुरुवात - तानाजी सावंत.

वनविभागाला दिलेल्या मागण्या मान्य करण्यासाठी दिला २१ दिवसांचा अल्टिमेटम.


-------------------------

माधुरी मस्कर -पन्हाळा.

----------------------------

चांदोली राष्ट्रीय उद्यानातील हिंस्त्र वन्य वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे चांदोली परिसरातील गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या वन्य प्राण्यांकडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर येथील मानवाच्या जीविताचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.गेल्या तीन - चार वर्षात लहान मुले, स्त्रिया आणि वयोवृद्ध नागरिकांवर बिबट्या, रान गवा यांच्या हल्ल्यात वाढ झालेली आहे, तसेच शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. तरीही संबधीत वनविभागाकडून कोणत्याही ठोस उपाय - योजना होताना दिसत नाही परिणामी त्यांच्या उदासीन कार्य पद्धतीच्या पार्श्वभूमीवर चांदोली अभयारण्याच्या नांदोली नाक्यावर वन्यप्राणी हल्ला प्रतिबंध व शेतकरी संरक्षण जनचळवळ समितीच्या वतीने आज तीव्र जनआंदोलन करण्यात आले. आंदोलनात परिसरातील शेतकरी व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अभयारण्यात असणाऱ्या बिबट्या, रान गवा या हिंस्त्र वन्यप्राण्यांचा गेल्या तीन -चार वर्षात जंगल क्षेत्रात कमी आणि मानवी वस्तीत जास्त प्रमाणात वाढलेला वावर धोकादायक ठरत आहे. त्यांच्या हल्ल्यात निष्पाप लहान मुले, वयस्कर लोक आणि शेतकऱ्यांचे पशुधन यांचे बळी जात आहेत.शिराळा, शाहूवाडी तालुक्यातील अनेक गावामध्ये अशा घटना घडत असल्यामुळे येथील नागरिकांच्या मध्ये वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रचंड रोष आणि नाराजी असल्याचे दिसून येते.

या जाचक त्रासातून शेतकरी कायमचा मुक्त व्हावा या अनुषंगाने वन्य प्राणी हल्ला प्रतिबंध व शेतकरी संरक्षण जण चळवळीच्या माध्यमातून 

समितीचे अध्यक्ष तानाजी सावंत यांनी वनविभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर टीकास्त्र सोडले.यावेळी बोलताना ते म्हणाले या आंदोलनातून जंगल सत्याग्रहाची सुरुवात झाली असून वन्यजीव व प्रादेशिक वादात शेतकरी भरडला जात आहे. 

यावेळी आंदोलकांनी प्रशासनाकडे विविध मागण्या मांडल्या त्यामध्ये पिकांच्या नुकसानीसाठी प्रति एकर किमान २ लाख रुपयांची वार्षिक नुकसानभरपाई, पंचनामे ७ दिवसांत पूर्ण करून तात्काळ भरपाई, अभयारण्य सीमारेषेवर सोलार फेन्सिंग, संरक्षणात्मक खंदक (ट्रेंच-कम-बंड), सोलार कुंपणासाठी १०० टक्के अनुदान, वन्यजीव संरक्षण कायद्यात सुधारणा, रात्री गस्त पथक व हेल्पलाईन सुरू करणे आणि वारंवार दिसणाऱ्या बिबट्यांना पकडण्यासाठी विशेष पथक नेमणे आदी मागण्या करण्यात आल्या.

सदरचे आंदोलन लोकशाही मार्गाने आणि शांत, शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले असले तरी भविष्यात होणारी आंदोलने अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. २१ दिवसांत मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास उग्र आंदोलन छेडले जाईल, असा अल्टिमेटम यावेळी देण्यात आला. तसेच आम्हाला बिबट्या पाळण्याची परवानगी द्यावी,अशी मागणीही आंदोलकांनी केली.यावेळी कोकरूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सुहास घोडे-पाटील, ॲड. रवि पाटील, राजू वडाम, शिवाजी पाटील, सावळा पाटील, शंकर मोहिते, बाळासाहेब कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनात तालुकाध्यक्ष संजय पाटील, विजय पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

No comments:

Powered by Blogger.