ग्रामपंचायत प्रभाग क्र. ३ मध्ये आनंदराव धुंदरे बिनविरोध ग्रामपंचायत इतिहासात पहिल्यांदाच सर्वानुमते निवड
ग्रामपंचायत प्रभाग क्र. ३ मध्ये आनंदराव धुंदरे बिनविरोध
ग्रामपंचायत इतिहासात पहिल्यांदाच सर्वानुमते निवड.
--------------------
विजय बकरे.
-------------------
राधानगरी तालुक्यातील राशिवडे ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक ३ मधील रिक्त जागेवर आनंदराव कृष्णा धुंदरे यांची बिनविरोध निवड झाली असून, ग्रामपंचायतीच्या राजकीय इतिहासात प्रथमच अशी सर्वानुमते निवड झाल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे.राशिवडे ही तालुक्यातील सर्वात मोठ्या, १७ सदस्यीय ग्रामपंचायतींपैकी एक असून, प्रभाग क्रमांक ३ मधील जागा रिक्त होती. या जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर धुंदरे–पाटील गटाकडून आनंदराव धुंदरे, सुशांत धुंदरे, किरण बिल्ले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर विरोधी गटाकडून संजय डकरे व ऋषिकेश डकरे यांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते.माघारीच्या अंतिम दिवशी आनंदराव धुंदरे वगळता इतर सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. या निवडीसाठी विविध गटांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.या प्रक्रियेत जिल्हा परिषद सदस्य सागर धुंदरे, माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य मोहन धुंदरे, सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील, राजेंद्र पाटील, एकनाथ चौगले, संजय डकरे, ग्रामपंचायत सदस्य निवास डकरे, प्रकाश धुंदरे, चंद्रकांत ताडे आदींचे सहकार्य लाभले.
निवडीनंतर राशिवडे व परिसरातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आनंदराव धुंदरे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
चौकट : इतिहासात पहिल्यांदाच बिनविरोध निवड.
-------------------------------------------
राशिवडे ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी एकमताने समझोता करून प्रभाग क्रमांक ३ मधील पोटनिवडणुकीत इतर उमेदवारांनी अर्ज मागे घेत आनंदराव धुंदरे यांची बिनविरोध निवड केली. या निर्णयामुळे गावात समाधानाचे वातावरण असून, ही निवड चर्चेचा विषय ठरत आहे.

No comments: