Header Ads

आजरा येथे भिंत कोसळून दुर्दैवी दुर्घटना; महिला व अल्पवयीन मुलीचा जागीच मृत्यू

आजरा येथे भिंत कोसळून दुर्दैवी दुर्घटना; महिला व अल्पवयीन मुलीचा जागीच मृत्यू

---------------------------

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी :

-----------------------------

आजरा शहरातील वाणी गल्ली येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास जुन्या घराची भिंत पाडताना भीषण दुर्घटना घडली. देशपांडे डॉक्टर यांच्या जुन्या घराची दक्षिणेकडील रस्त्यालगतची भिंत पाडण्याचे काम सुरू असताना अचानक भिंत कोसळली. या दुर्घटनेत भिंत अंगावर पडून मातीच्या ढिगाऱ्याखाली दोघी जणी अडकल्याने  त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मृतांमध्ये वैष्णवी तुकाराम भोसले (वय 14, इयत्ता 6 वी) व ज्योती नितीन कुंभार (वय 45, व्यवसाय – प्राध्यापिका) यांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, या दुर्घटनेत ललिता तुकाराम भोसले (वय 42) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर गडहिंग्लज येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. पोलिस व संबंधित यंत्रणाही घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे.

ही घटना निष्काळजीपणामुळे घडली का, याबाबतही चौकशी केली जात आहे.

No comments:

Powered by Blogger.