Header Ads

शाहुवाडी तालुक्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५२ वी जयंती उत्साहात साजरी.

 शाहुवाडी तालुक्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५२ वी जयंती उत्साहात साजरी.

------------------------------------
मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते: 
------------------------------------

 लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५२ वी जयंती शाहुवाडी तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तालुक्यातील प्राथमिक शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, तहसील कार्यालय, नगरपालिका, पोलीस ठाणे तसेच विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

पंचायत समिती शाहुवाडीच्या प्रांगणातील राजर्षी शाहू महाराज यांच्या अर्धपुतळ्यास पंचायत समितीचे उपसभापती अमरसिंह खोत आणि विरोधी पक्ष गटनेते अभयसिंग चौगुले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच पंचायत समिती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पंचायत समिती सदस्या डॉ. धनश्री पाटील व लक्ष्मी पाटील यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार, कक्ष अधीक्षक संजय अवघडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एच. आर. निरंकारी, गट शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी पवार, बांधकाम अभियंता डी. एस. कांबळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.