कागल व्हनाळी येथे शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू...
कागल व्हनाळी येथे शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू...
कागल : व्हनाळी येथील प्रगतशील शेतकरी नामदेव ज्ञानदेव वाडकर हे रविवारी दि.21/06/2026 रोजी जनावरांना वैरण आणण्यासाठी शेतात गेले होते. शेतातील वैरण घेऊन बांधावरून खाली उतरत असताना त्यांचा पाय घसरून त्यांना दुखापत झाली. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले..
नामदेव वाडकर हे व्हनाळी येथील मेजर आनंदराव घाटगे दूध संस्थेचे अध्यक्ष व गावातील प्रगतशील शेतकरी आणि स्वभावाने मनमिळावू असल्याने सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व होते त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे..
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे..
रक्षाविसर्जन दि.24/06/2026 रोजी व्हनाळी येथे आहे..

No comments: