ओतुर पोलीस स्टेशनची कारवाई: एका दिवसात 69 वाहनांवर ₹85,800 चा दंड..
ओतुर पोलीस स्टेशनची कारवाई: एका दिवसात 69 वाहनांवर ₹85,800 चा दंड.अपघात रोखण्यासाठी कडक पावले, नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा
(आळेफाटा प्रतिनिधी कैलास बोडके)
ओतुर(ता. जुन्नर )पोलीस स्टेशन हद्दीत वाढत्या अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. महिनाभरात 2-3 मोठे अपघात होऊन जीवितहानी झाल्याने पोलिसांनी विविध उपाययोजना करूनही अपघात थांबत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आज दि. 22 जून रोजी पोलिसांनी विशेष मोहीम राबवून 69 वाहनांवर कारवाई करत एकूण ₹85,800 चा दंड वसूल केला.
ओतुर पोलिसांनी 'ब्लॅक स्पॉट' शोधून त्या ठिकाणी रमलर सूचना फलक,ब्लिकलर, कलर पट्ट्या मारणे, नागरिकांमध्ये जनजागृती करणे विविध सूचनांचे फलक लावणे अशा उपाययोजना केल्या आहेत. मात्र तरीदेखील अपघातांचे प्रमाण कमी होत नसल्याने पोलिसांनी आता नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
घेतला असून या विशेष मोहिमेत ओतूर पोलिसांनी एकूण 69 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. यामध्ये मोबाईलवर संभाषण करत गाडी चालवणे - 03, ब्लॅक काच - 04, ट्रिपल सीट - 08, विना हेल्मेट - 03, नंबर प्लेटबाबत अपराध - 06, विना सीट बेल्ट - 01, विना लायसन्स - 07 व इतर 37 केसेसचा समावेश आहे.अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांनी दिली आहे.
"सर्व प्रकारचे अपघात कमी करणे हेच आमचे ध्येय आहे. जे वाहनचालक नियम मोडतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल," असे ओतुर पोलीस स्टेशनकडून सांगण्यात आले. सर्व दोनचाकी व चारचाकी वाहनचालकांनी नियमात व कमी वेगात गाडी चालवावी, वाहतुकीचे नियम पाळावेत व पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही ओतूर पोलिसांनी केले आहे.

No comments: