Header Ads

ओतूरहून पंढरपूरकडे आषाढी वारी पालखी सोहळा प्रस्थान. ओतूर पोलीसांकडून वारकऱ्यांसाठी चहा-नाश्त्याची व सुरक्षेची व्यवस्था

 ओतूरहून पंढरपूरकडे आषाढी वारी पालखी सोहळा प्रस्थान ओतूर पोलीसांकडून वारकऱ्यांसाठी चहा-नाश्त्याची व सुरक्षेची व्यवस्था.

आळेफाटा -प्रतिनिधी ओतूर(ता. जुन्नर ) येथील श्री बाबाजी चैतन्य महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा दि. ३ जुलै रोजी सायंकाळी ५:३० वा. च्या सुमारास श्री क्षेत्र ओतूर येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झाला. 

ओतूर पोलीस स्टेशनच्या वतीने वारीमध्ये सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांसाठी पोलीस स्टेशन येथे चहा व अल्पउपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी सुमारे १५० ते २०० वारकरी उपस्थित होते.

पालखी सोहळा मार्गस्थ होत असताना रस्त्यावर वाहतूक व सुरक्षेच्या अनुषंगाने वारकऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. तसेच ओतूर पोलीस स्टेशन हद्दीतून पालखी सुखरूप पुढे जाईपर्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंदोबस्तादरम्यान सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी दिली.

भक्तिमय वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पालखी सोहळा पुढील मार्गाने रवाना झाला.

No comments:

Powered by Blogger.