Header Ads

श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा!

 श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा!अभिजीत तायशेटे फौंडेशन व जेनेसिस कॉलेजचा राधानगरीत वृक्षारोपण, रोपवाटप आणि रुग्णांना फळे वाटपाचा आदर्श उपक्रम.

---------------------------------------
राधानगरी | प्रतिनिधी विजय बकरे.
----------------------------------------

श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त राधानगरी येथे पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम पाहायला मिळाला. 'अभिजीत तायशेटे फौंडेशन' आणि 'जेनेसिस कॉलेज, राधानगरी' यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण, ३०० हून अधिक रोपांचे वाटप तसेच राधानगरी व सोळांकुर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करून वाढदिवस विधायक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तायशेटे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस केवळ उत्सव म्हणून नव्हे, तर समाजाला सकारात्मक दिशा देणाऱ्या उपक्रमांनी साजरा करण्याची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांना ३०० हून अधिक रोपांचे वाटप करण्यात आले, तर रुग्णांना फळे देऊन सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडविण्यात आले.

या कार्यक्रमाला पंचायत समितीचे सभापती आर. वाय. पाटील, उपसभापती अश्विनी चंद्रकांत चौगले, जिल्हा परिषद सदस्या संयोगिता मोरे, पंचायत समिती सदस्य मोहन पाटील, अमृता पाटील, एस. ए. पाटील, वंदना जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सुरेश पाटील, मारुती टेपुगडे, प्रा. डॉ. चंद्रशेखर कांबळे, दादासो सांगावकर, युवराज कुंभार, संजय पारकर, रमेश राणे, नितीन केरकर, राजाराम निऊंगरे, महेश मोरये, किरण बोंबाडे, संजय शेटके, चंद्रकांत चौगले, दत्तात्रय चौगले, महादेव पाटील, शहाजी वागरे आदींची उपस्थिती होती.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अभिजीत तायशेटे फौंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जेनेसिस कॉलेजच्या प्राध्यापक व शिक्षकवृंदाने विशेष परिश्रम घेतले. पर्यावरण संरक्षण आणि समाजसेवेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

No comments:

Powered by Blogger.