Header Ads

पिंपळवंडी येथे मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

 पिंपळवंडी येथे मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद  शेतकरी दिन व डॉक्टर्स दिनाचे औचित्य, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक व महिलांनी घेतला लाभ......

आळेफाटा (प्रतिनिधी ) :पिंपळवंडी (ता. जुन्नर )येथील मळगंगा सभागृहात संत सावळेरामबाबा ज्येष्ठ नागरिक संघ, लुमॅक्स कंपनीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत इम्पॅक्ट गुरू फाउंडेशन व दिपज्योत मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी दिन व डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य मंगेश काकडे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी जि.प. सदस्य शरदराव लेंडे, पिंपळवंडी वि.का.स. सोसायटीचे चेअरमन रघुनाथशेठ लेंडे, यशवंत नागरी सहकारी पतपेढीचे संस्थापक महादेव वाघ, बाळासाहेब काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.शिबिरात हिमोग्लोबिन, रक्तातील साखर, रक्तदाब व हाडांची ठिसूळता यांसह विविध तपासण्या करण्यात आल्या व गरजूंना मोफत औषधोपचार देण्यात आला. शेतकरी, ज्येष्ठ नागरिक व महिलांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.

या कार्यक्रमाचे आयोजन दिपज्योत मेडिकल फाउंडेशनचे संस्थापक दिपक सोनवणे व इम्पॅक्ट गुरू फाउंडेशनचे राजेश दुबेवार, राहुल कांबळे, अनिल जाधव यांनी केले. डॉ. कुलदीप देशमुख, फार्मासिस्ट अभिषेक देवरे, फील्ड एक्झिक्युटिव्ह सर्वेश भुसे, संभाजी माने यांनी तपासणीचे काम पाहिले.

याप्रसंगी पिंपळवंडीचे सुपुत्र असलेल्या ज्येष्ठ साहित्यिक कवींची कविता पाठ्यपुस्तकात समाविष्ट झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

मान्यवरांनी संत सावळेरामबाबा ज्येष्ठ नागरिक संघाने लुमॅक्स आयजीएफच्या सीएसआर निधीतून राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. अध्यक्ष अशोकशेठ सोनवणे, उपाध्यक्ष सत्यवान काकडे, सेक्रेटरी तुकाराम येंधे, खजिनदार सुखदेव लेंडे, प्रफुल्ल कसबे, ह.भ.प. दत्तामहाराज वाघ यांच्यासह संघाचे पदाधिकारी, सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

शिबीर यशस्वी करण्यासाठी पिंपळवंडी ग्रामस्थ व ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी विशेष सहकार्य केले आहे.

No comments:

Powered by Blogger.