डी सी नरके कॉलेजमध्ये नवागतांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न.
डी सी नरके कॉलेजमध्ये नवागतांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न.
--------------------कुडित्रे दि.२ जुलै येथील डी सी नरके ज्युनिअर कॉलेज,कुडित्रेमध्ये इयत्ता ११ वी कला,विज्ञान शाखेत नवागत विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ अत्यंत उत्साही आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या अधिकृत सुरुवातीनिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयात पहिल पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येक नवागत विद्यार्थ्याचे स्वागत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डी एस चौगले सर यांनी गुलाबपुष्प व पेन देवून केले.
यावेळी इयत्ता ११ वीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांनी केले. याप्रसंगी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या शिस्तीची, शैक्षणिक प्रणालीची आणि ग्रंथालय सुविधांची सविस्तर माहिती दिली. आपल्या भाषणात ते म्हणाले "शालेय जीवनातून कॉलेज जीवनात प्रवेश करताना स्वातंत्र्य मिळते पण त्यासोबत जबाबदारीही येते. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत विविध क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांत भाग घेऊन स्वतःचा सर्वांगीण विकास करावा". विभागप्रमुख प्रा. एम बी मोहिते यांनी बोर्ड परीक्षा व इतर सहशालेय उपक्रमांच्या तयारीला लागण्याचा सल्ला दिला. यावेळी कु. ऋतुजा सखाराम बरगे इयत्ता १२ वीच्या विद्यार्थींनीने आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. पी जे पाटील यांनी केले. सूत्रसंचलन प्रा.ए एस मुल्ला यांनी तर आभार प्रा. जे एम आंगठेकर यांनी मानले.

No comments: