Header Ads

तब्बल २१.५ कोटींचा गांजा-कोकेन जाळून खाक! सांगली पोलिसांची राज्यातील मोठी कारवाई.

 तब्बल २१.५ कोटींचा गांजा-कोकेन जाळून खाक! सांगली पोलिसांची राज्यातील मोठी कारवाई.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~
 सांगली मिरज कुपवाड प्रतिनिधी.
 राजू कदम.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सांगली | प्रतिनिधी

सांगली जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत तब्बल ₹२ कोटी १५ लाख किमतीचा (२.१५ कोटी रुपये) गांजा व कोकेन जाळून नष्ट केला. जिल्ह्यातील १७ पोलीस ठाण्यांमध्ये दाखल ६५ गुन्ह्यांतील १,०२१ किलो गांजा आणि २७६ ग्रॅम कोकेन न्यायालयाच्या आदेशानंतर गुरुवारी मिरज एमआयडीसी येथील अधिकृत प्रकल्पात नाश करण्यात आला.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. एनडीपीएस कायद्यातील कलम ५२(अ) नुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सुर्या सेंटर ट्रीटमेंट फॅसिलिटी प्रा. लि., मिरज येथे अत्याधुनिक बॉयलरमध्ये अंमली पदार्थ जाळून नष्ट करण्यात आले.

या मुद्देमालामध्ये सन २००९ ते २०२६ या कालावधीत लागवड, वाहतूक, विक्री आणि सेवनाशी संबंधित गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले अंमली पदार्थ होते. न्यायालयाची परवानगी, विविध केंद्रीय यंत्रणांची मंजुरी आणि अंमली पदार्थ मुद्देमाल नाश समितीच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडली.

या वेळी अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलीस उपअधीक्षक गजानन सरगर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, रासायनिक विश्लेषक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, वैध मापन शास्त्र विभाग, अग्निशमन दल आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महत्त्वाची बाब म्हणजे, संपूर्ण प्रक्रिया पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही, याची काळजी घेत दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत आणि कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडली.

No comments:

Powered by Blogger.