माझे गाव आरोग्य संपन्न गाव मांडवा येथे अभियान,
माझे गाव आरोग्य संपन्न गाव मांडवा येथे अभियान,
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~माझे गाव आरोग्य संपन्न गाव मोहिमेअंतर्गत डेग्यु प्रतिरोध महिना जूलै 2026
डॉ.तनवीर शेख जिल्हा हिवताप अधिकारी यवतमाळ यांच्या आदेशानुसार, डॉ.नामदेव सरकुंडे तालुका आरोग्य अधिकारी पुसद,व डॉ. गणेश काळे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 9 जूलै 2026रोजी उपकेंद्र सांडवा अंतर्गत मांडवा येथे नियमित फिरती किटकशास्त्रीय व तापरुग्णांचे सर्वेक्षण तसेच टेमिफॉस उपाययोजना राबविण्यात आली.
ग्रामपंचायतला भेट देऊन शेरा लिहिला.
~~~~~~~~~~~~~~~~
या मोहिमेअंतर्गत गृहभेटी देऊन पाणी साठवणुकीच्या ठिकाणांची तपासणी करण्यात आली. डासांच्या आळ्यांची उत्पत्ती रोखण्यासाठी टेमिफॉस औषधाचा वापर करण्यात आला. तसेच तापरुग्णांचे सर्वेक्षण करून आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले.किटकजन्य व जलजन्य आजारांविषयी जनजागृती करण्यात आली. व ओटी टेस्ट घेतल्या.व जैविक पाणी नमुने तपासणी घेतले.नागरिकांना डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, अतिसार, टायफॉईड यांसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी सूचना देण्यात आल्या.
पाणी साठवणुकीची भांडी झाकून ठेवावीत.~~~आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा.
घर व परिसर स्वच्छ ठेवावा.
पिण्याचे पाणी उकळून किंवा शुद्ध करून वापरावे.
ताप, अंगदुखी किंवा इतर लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.
जोखमीच्या गरोदर मातांना भेट देण्यात आली.
यावेळी सचिन गोरे आरोग्य सेवक व देविका साखरे आशावर्कर इत्यादी उपस्थित होते.

No comments: