आंतरशालेय 'राजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाइन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद १०११ विद्यार्थ्यांचा सहभाग; स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवरील उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
आंतरशालेय 'राजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाइन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद१०११ विद्यार्थ्यांचा सहभाग; स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवरील उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
कोल्हापूर (प्रतिनिधी) :- युवक कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत (MY Bharat), कोल्हापूर तसेच प्रफुल्लित केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा परिचय व्हावा, भारतीय संविधानाबाबत जनजागृती निर्माण व्हावी तसेच शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची प्रेरणा मिळावी या उद्देशाने आंतरशालेय 'राजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाला परिसरातील विविध शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण १०११ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून ज्ञान, कौशल्य व स्पर्धात्मक वृत्तीचे दर्शन घडविले.स्पर्धेची रचना स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवर करण्यात आली होती. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच स्पर्धा परीक्षांबाबत आत्मविश्वास निर्माण व्हावा, ऑनलाइन परीक्षांचा अनुभव मिळावा तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत गुणवत्तापूर्ण मूल्यमापन व्हावे, या दृष्टीने प्रश्नमंजुषेचे विशेष रचना करण्यात आली होती.
या ऑनलाइन परीक्षेचे एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषा पूर्ण केल्यानंतर त्यांना तत्काळ निकाल, गुणपत्रिका,सहभागाचे प्रमाणपत्र, आंतर शालेय क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखली गेली असून विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
स्पर्धेतील प्रत्येक सहभागी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या संबंधित शाळेत जाऊन पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या गौरव समारंभास मेरा युवा भारतचे सहाय्यक निलेश कांबळे, संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थापक व विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. प्रफुल्ल पाटील, अध्यक्षा तसेच महाराष्ट्र शासन जिल्हा युवती पुरस्कार विजेत्या डॉ.अल्फिया बागवान,संचालिका बिस्मिल्ला नदाफ यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करणे, राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची ओळख करून देणे आणि भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास व स्पर्धात्मक दृष्टिकोन विकसित करणे या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

No comments: