Header Ads

कुडित्रे परिसरात पेरणी उपयुक्त पाऊस,शेतकरी आनंदीत.


कुडित्रे परिसरात पेरणी उपयुक्त पाऊस,शेतकरी आनंदीत. 


प्रा.पी जे पाटील


कुडित्रे ता करवीर येथील चिंचवडे, भामटे,कळंबे, आडूर, कोपार्डे, कुडित्रे, वाकरे आसपासच्या भागात गेल्या दोन दिवसांपासून पेरणी उपयुक्त झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. समाधानकारक ओलावा झाल्याने खरीप हंगामाची पेरणी आता वेगाने सुरू झाली आहे.

चांगला ओलावा,पेरणीला गती,

 हवामान विभागाच्या अंदाजानुसार कुडित्रे परिसरात सोमवार,मंगळवार आणि बुधवारी चांगला पाऊस नोंदवला गेला. या पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा तयार झाला असून,भात पेरणी, भातरोप लागण,भुईमुग, 

नाचणी,सोयाबीन,मका,तूर, उडीद,श्रावण घेवडा,बाजरी आणि अन्य वेलवर्गीय पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. संपूर्ण मृग नक्षत्राबरोबर गेल्या दोन-तीन आठवड्याभरापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना हा पाऊस दिलासा देणारा ठरला आहे.

No comments:

Powered by Blogger.