बनावट NEFTचा खेळ उघड! १२ तासांत सराईत जेरबंद; १२ गुन्हे उघड, ₹२३.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
बनावट NEFTचा खेळ उघड! १२ तासांत सराईत जेरबंद; १२ गुन्हे उघड, ₹२३.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
~~~~~~~~~~~सातारा : बनावट NEFT व्यवहाराचा स्क्रीनशॉट दाखवून महागडे मोबाईल आणि सोने लंपास करणाऱ्या सराईत आरोपीला सातारा शहर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली आहे. या कारवाईत महाराष्ट्र आणि गोव्यातील तब्बल १२ फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आले असून आरोपीकडून ₹२३.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आदित्य विनोद गायकवाड (वय २२, रा. कोंढापुरी, ता. शिरूर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. साताऱ्यातील पोवई नाका येथील मोबाईल दुकानातून सुमारे ₹१.७५ लाखांचा मोबाईल खरेदी करून ऑनलाइन पेमेंट केल्याचा बनावट NEFT स्क्रीनशॉट दाखवत तो पसार झाला होता.
सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे डी.बी. पथकाने आरोपीला जेरबंद केले. चौकशीत त्याने सातारा, सांगली, पुणे, रायगड आणि गोव्यात अशाच प्रकारे फसवणूक केल्याची कबुली दिली. आरोपीकडून सोने, महागडे मोबाईल, टीव्ही, एसी, कार आणि मोबाईल असा ₹२३.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणानंतर पोलिसांनी व्यापाऱ्यांना केवळ पेमेंटचा स्क्रीनशॉट पाहून माल न देता, खात्यात रक्कम जमा झाल्याची खात्री करूनच व्यवहार करण्याचे आवाहन केले आहे.

No comments: