शिष्यवृत्ती परीक्षेत डी.सी.नरके विद्यानिकेतनचे घवघवीत यश.
शिष्यवृत्ती परीक्षेत डी.सी.नरके विद्यानिकेतनचे घवघवीत यश.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~कुडित्रे: (ता.करवीर)येथील डी.सी.नरके विद्यानिकेतनच्या तीन विद्यार्थ्यांनी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षामध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
इयत्ता आठवीचे अर्जून पाटील, समर्थ खोत व गौरव जगताप या तिघा विद्यार्थ्यांनी जिल्हा यादीमध्ये स्थान मिळवत विद्यानिकेतनचा व संस्थेच्या यशाचा आलेख चढता राखला.
या यशस्वी विद्यार्थ्यांना कुंभी-कासारी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी व आमदार चंद्रदीप नरकेसो, कुंभी-कासारी बॅंकेचे चेअरमन व 'गोकुळ'चे माजी संचालक अजित नरके सो यांचे प्रोत्साहन तर विद्यानिकेतनचे प्राचार्य डी.एस्.चौगले, पर्यवेक्षक एस्.जे.डुबल तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments: