Header Ads

ओतूर पोलिसांची तत्परता; डायल 112 कॉलनंतर काही मिनिटांत महिलेचे प्राण वाचले.

 ओतूर पोलिसांची तत्परता; डायल 112 कॉलनंतर काही मिनिटांत महिलेचे प्राण वाचले


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

आळेफाटा कैलास बोडके.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आळेफाटा (जुन्नर)

घरगुती कारणातून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे प्राण ओतूर पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले. डायल 112 वर कॉल मिळाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वेळेत उपचार मिळवून दिल्याने मोठा अनर्थ टळला.

साबळेवाडी (सांगणोरे, ता. जुन्नर) येथील रेश्मा लक्ष्मण साबळे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती डायल 112 वर प्राप्त होताच ओतूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जनार्दन सापटे आणि महिला पोलीस शिपाई संगीता दिघे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

दोन्ही पोलिसांनी प्रसंगावधान राखत रुग्णवाहिका बोलावली. वेळेत रुग्णवाहिका दाखल झाल्याने संबंधित महिलेला ग्रामीण रुग्णालय, ओतूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर तिची प्रकृती स्थिर असून ती सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संकटसमयी दाखवलेले धाडस, कर्तव्यनिष्ठा आणि तत्परतेबद्दल पोलीस हवालदार जनार्दन सापटे व महिला पोलीस शिपाई संगीता दिघे यांचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Powered by Blogger.